शिवसेना उबाठा पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन; नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अर्ज केले दाखल

0
21

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अर्ज केले दाखल

नगराध्यक्ष पदासाठी सौ. पूजा प्रमोद करलकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नगराध्यक्ष पदासाठी अनुभवी चेहरा तर नगरसेवक पदासाठी सुशिक्षित व निष्कलंक उमेदवार दिले- वैभव नाईक

१९ वर्षे केलेल्या कामाच्या अनुभवावर शहरवासीय मतदानरुपी आशीर्वाद देतील-पूजा करलकर

मालवण नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणता उमेदवार दिला जाणार याची उत्सुकता मालवण वासियांना लागली होती. मालवण शहर विकासासाठी अनुभवी चेहरा देण्याची जनतेची मागणी असल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी मोठी खेळी करत काल रविवारी नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेविका सौ. पूजा प्रमोद करलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आज सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी सौ. पूजा प्रमोद करलकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी श्री. तेजस मोतीराम नेवगी प्र.क्र.७(अ) व योगिता योगेंद्र गावकर प्र.क्र.३(ब) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासह जे उमेदवार देण्यात आले
आहेत, ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते तत्त्वाशी ठाम राहिलेले उमेदवार आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि सुशिक्षित व निष्कलंक असे उमेदवार दिले आहेत. अशा उमेदवारांच्या पाठीशी मालवण शहरवासीयांनी उभे राहावे. मी तुम्हाला विश्वास देतो की पुढील पाच वर्षे मालवण पालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने पार ते पाडतील. काही लोक राज्यात सत्ता असल्याने मालवण पालिका ताब्यात देण्याची मागणी करत आहेत. परंतु मालवण पालिकेत आजही १०० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. हा निधी प्रामाणिकपणे खर्च केल्यास मालवण शहराचा निश्चितच कायापालट होईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत शहरात जी काही कामे झाली आहेत. यात पालिकेची इमारत, नळपाणी योजना,भुयारी गटार, भूमिगत वीजवाहिन्या, बस स्टँड ही सर्व कामे मी आमदार असताना झाली आहेत. परंतु गेल्या साडेतीन वर्षात सत्ताधाऱ्यांनी काय आणले. हा प्रश्न सर्व मालवण वासियांनी त्यांना विचारला पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या विकासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुडाळ-मालवण हाच रस्ता विकासाबद्दल सर्व काही सांगून जातो. शहरातील खड्डेमय रस्ते हा त्यांचा विकास सांगून जातोय. शहराच्या नळपाणी योजनेचे काम वर्क ऑर्डर होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला तरी अद्याप त्यांनी सुरु केले नाही. भुयारी गटार योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी आणूनही ते काम अद्यापही पूर्ण केले नाही. सत्ताधाऱ्यांचे नाकर्तेपणाचे उदाहरण द्यायचे झाल्यास, मालवण पालिकेला एक वर्ष मुख्याधिकारीच नाही त्यामुळे साडेतीन वर्षे सत्ता असूनही आम्ही मंजूर केलेली विकास कामे ते पूर्ण करू शकले नाहीत.तर सत्ताधारी पुढे काय आणि कोणाचा विकास करणार हे आताच मालवणच्या जनतेला कळले आहे. अशी टीका वैभव नाईक यांनी केली.

वैभव नाईक पुढे म्हणाले, पालिकेच्या निवडणुकीसाठी जो चेहरा हवा तो अनुभवी असायला हवा. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर यांना कोणी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. कारण त्यांनी १९ वर्षे नगरसेविका म्हणून चांगले काम शहरात केले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर कोणताही डाग नसलेल्या त्या उमेदवार असून सर्व लोकांना विश्वासात घेऊनच पालिकेचा कारभार हाकतील. मालवण पालिकेच्या या सार्वत्रिक
निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष सह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आल्यास जिल्हा नियोजन मधून पालिकेला मिळणारा फंड आणि पालिकेत पडून असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून आमचे प्रामाणिक उमेदवार शहराचा कायापालट निश्चितच चांगल्या पद्धतीने करतील. जाती-धर्म पक्ष भेद विसरून आमचे उमेदवार काम करतील तसेच पालिकेच्या कारभारावर शहरवासीयांचाही अंकुश राहील,” असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर म्हणाल्या, मालवण पालिकेत नगरसेविका म्हणून १९ वर्षे नेतृत्व केले, चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. आणि भाजपची नगरसेविका म्हणूनही काम केले आहे. विकास कामांबरोबरच प्रशासकीय कामकाजाचा देखील अनुभव माझ्याकडे आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे. तू नगराध्यक्ष झाली पाहिजे, अशी शहरवासीयांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांचे मला या निवडणुकीत निश्चितच सहकार्य आणि मतदानरुपी आशीर्वाद मिळतील, असा विश्वास आहे. माझ्यासोबत जे नगरसेवक, नगरसेविका पदाचे उमेदवार आहेत. त्यांनाही निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन असे पूजा करलकर यांनी सांगितले.

यावेळी हरी खोबरेकर, नितीन वाळके,गणेश कुडाळकर, मंदार ओरसकर,महेश जावकर, प्रमोद करलकर उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर,अन्वय प्रभू, बंड्या सरमळकर,मनोज मोंडकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर,बाळू कोळंबकर, शिवसेनेचे महेश शिरपुटे, उमेश चव्हाण,निलेश दुदवडकर,पूजा जोगी,गौरी मयेकर, अनिता गिरकर,स्मिता सरमळकर,तेजस नेवगी,राधिका मोंडकर,महेंद्र म्हाडगुत, माधुरी प्रभू, वृंदा गवंडी,सुमित जाधव, उमेश चव्हाण,योगिता गावकर, अमृता मोंडकर,रुपाली फर्नांडिस, संदेश कोयंडे, नंदू गवंडी, श्रीराम गावकर,निनाक्षी शिंदे,रश्मी परुळेकर,श्वेता सावंत,आकांक्षा शिरपुटे, दीपाली शिंदे,रूपा कुडाळकर,जयदेव लोणे,अक्षय रेवंडकर,भार्गव खराडे,गणेश पाडगावकर, आयवान फर्नांडिस,प्रवीण लुडबे,हेमंत मोंडकर राजा शंकरदास,बाबू टेंबुलकर,समीर लब्दे,वंदेश ढोलम,अमोल वस्त,ज्ञानेश्वर गवंडी, बाळा मिटकर, चिंतामणी मयेकर,प्रथमेश सरमळकर, पायल आढाव, यतीन मेथर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here