रत्नागिरी– नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. माजी आमदार व नगराध्यक्ष राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली, हा निर्णय साळवी यांच्या राजकीय भविष्यासाठी धक्का मानला जात आहे.
माहितीनुसार, अथर्व साळवी यांच्या ऐवजी भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना चवंडे यांना शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, याच प्रभागातून राजन साळवी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि रत्नागिरीचे नगराध्यक्षपद देखील भूषवले होते.
मूळ पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश… अन् आता स्वतः च पक्षाकडूनच धक्का!
राजन साळवी यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सोडून शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. परंतु त्यांच्या मुलाला उमेदवारी न मिळाल्यामुळे आता त्यांची नाराजी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते
▪️निर्णय हा तात्काळ धक्का असला, तरी त्याचा मतदारांवर आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीवर प्रभाव पडू शकतो. ▪️नाराज साळवी गट मूकपणे मतदानावर परिणाम करू शकतो. ▪️जर नाराजी वाढली तर विरोधकांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आगामी निवडणुकांमध्ये या राजकीय धक्क्याचा परिणाम काय?
राजन साळवी गप्प बसतात की निर्णयाला प्रत्यक्षात विरोध व्यक्त करतात, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. नाराज साळवी प्रभावी आहेत की शिंदे गट रणनीतिक, हा संघर्ष मतपेटीत उत्तर देईल

