मुरुड नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा राजकीय धक्का बसला असून, दोन वेळा नगराध्यक्षपद भूषवलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या स्नेहा किशोर पाटील यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान एबी फॉर्म संदर्भातील तांत्रिक कारणावरून बाद ठरवण्यात आला. या निर्णयाने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भंडारी समाजात तीव्र नाराजी उसळली आहे.


