अलिबाग ते श्री क्षेत्र नरसोबाची वाडी थेट एसटी सेवा सुरू; भाविकांसाठी सुखदायक सुविधा
अलिबाग – कोकणातील अलिबाग शहरातून श्री क्षेत्र नरसोबाची वाडी (दत्त मंदिर) येथे आता थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार अलिबाग – नरसोबाचीवाडी – कुरुंदवाड अशी नवीन एसटी सेवा सुरू केली असून कोल्हापूर विभागातील कुरुंदवाड आगारातून ही बस सुटणार आहे.
◾ बसची सुटण्याची वेळ: कुरुंदवाडहून: सकाळी 08:30 अलिबागहून: सकाळी 05:30
साध्या लालपरी प्रकारातील ही बस असून दीर्घ प्रवासात आराम मिळावा म्हणून पुशबॅक सीट आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट यांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांसह सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
◾ तिकीट भाडे:
-
प्रौढ : ₹710 लहान मुले : ₹355 महिला सन्मान योजना : ₹355
या बससाठी एसटी महामंडळाच्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. तसेच, या बसचे अलिबाग–स्वारगेट–अलिबाग या मार्गावरही आरक्षण करता येणार असल्याने पुणे व परिसरातील प्रवाशांसाठीही ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.
◾ बसचा संपूर्ण मार्ग:
अलिबाग, पिंपळभाट, कार्लेखिंड, पेझारी, पोयनाड, वडखळ, पेण, खोपोली, लोणावळा, कार्ले, तळेगाव फाटा, देहूरोड, निगडी, चिंचवड, वल्लभनगर, वाकडेवाडी, स्वारगेट, सातारा, कराड, इस्लामपूर, सांगली, जयसिंगपूर, शिरोळ, नरसोबाची वाडी (श्री क्षेत्र दत्त मंदिर दर्शनस्थळ), कुरुंदवाड.
एसटी महामंडळाची ही नवी सेवा सुरू झाल्याने अलिबाग ते कोल्हापूर व नरसोबाची वाडी या दरम्यान प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, कामगारांना तसेच भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा : दुबई एअर शोमध्ये भारतीय तेजस लढाऊ विमानाचा अपघात; पायलटाचा दुर्दैवी मृत्यू


