Kokan: पनवेल-चिपळूण थेट रेल्वे सेवा ; तिकीट फक्त ५0 रूपये

0
40
गणेशोत्सव, कोकण-गोव्यापर्यंत नियमित रेल्वे गाड्या सोडाव्यात
पश्चिम रेल्वेनेही कोकण-गोव्यापर्यंत नियमित रेल्वे गाड्या सोडाव्यात -मोहन केळुसकर

चिपळूण- कोकण रेल्वेतर्फे पनवेल-चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. गाडी ४ सप्टेंबर ते ३0 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. या गाडीला १२ डबे असतील. त्यामध्ये एक पहिल्या वर्गाचा व एक महिलांचा डबा असणार आहे. या गाडीचे आरक्षण होणार नसून प्रवाशांना करंट बुकिंग करावे लागणार आहे. जुन्या रेल्वे स्थानकाच्या खिडकीवर तिकिटे उपलब्ध होतील. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेना-ठाकरे-गटाचे-माजी/

ही गाडी सकाळी ११ वा. १0 मि. सुटेल. रोहा,कोलाड,इंदापूर,माणगाव,गोरेगाव रोड,वीर,सपे वामने,करंजाडी,विनहेरे,दिवानखावटी,खेड,अंजनी,चिपळूण आदी ठिकाणांहून प्रवास करीत त्याच दिवशी संध्याकाळी चिपळूणला ४ वा. पोहचेल. चिपळूणहून ही गाडी सायं. ५.३0 वा. पनवेलकडे याच मार्गाने रात्री १0.३0 वाजता पोहोचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here