चव्हाणांनी अंबरनाथ मधील मतदार घोळ मान्य केला – आमदार रोहित पवार
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वतः अंबरनाथ मधील मतदार याद्यांमधील घोळाची दाखल घेतली व मान्य केला आहे – आमदार रोहित पवार
मतदार याद्यांमध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव आम्ही पुराव्यानीशी उघड केला असता त्यावर ही राजकीय टीका असल्याचं म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वतः अंबरनाथमधील मतदार याद्यांमधील घोळाची तक्रार करतायत.
हा घोळ आधी मा. आशिष शेलार साहेब आणि आता उशिरा का होईना रवींद्र चव्हाण साहेबांनीही मान्य केला, याबद्दल त्यांचे आभार. आता विरोधकांबरोबर सत्ताधारीही मतदार याद्यांवर आक्षेप घेत असेल तर राज्य निवडणूक आयोग ही निवडणूक जनतेवर का लादतोय ?
याद्यांमधील घोळाबाबत विरोधकांनी आरोप केल्यावर झोपा काढणाऱ्या निवडणूक आयोगाला आता जागं होऊन हे घोळ निस्तरावेच लागतील… कारण आता आरोप करणारे विरोधी पक्षाचे नाहीत तर खुद्द निवडणूक आयोगाचे ‘मालक’ आहेत…! आता किमान ‘मालकाचा आदेश’ तरी पाळला जातो की नाही, याकडं आमचं बारकाईने लक्ष आहे असे रोहित पवार म्हणाले.


