सिंधुदुर्गच्या कुमार गट राज्य स्पर्धेत पांग्रडच्या कु. विराज प्रल्हाद मर्गज याची निवड
मुंबई उपनगर (पूर्व) कबड्डी संघातून खेळण्याची पांग्रड गावच्या विराजला संधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावच्या मुलाने मेहनत, जिद्दीच्या जोरावर कु. विराज प्रल्हाद मर्गज याने राज्य पातळीवरील कबड्डीसंघात आपली दमदार हजेरी नोंदवली आहे.
उच्च शिक्षणाच्या शोधात मुंबईत आलेल्या विराजने कधीही आपल्या स्वप्नांना दुरावू दिले नाही. शिस्तबद्ध सराव, कष्टने तो दिवसेंदिवस स्वतःला अधिक सक्षम बनवत राहिला. उत्कर्ष क्रीडा मंडळ, भांडुप येथे मिळालेले उत्कृष्ट प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि अखंड पाठिंब्यामुळे विराजने आपल्या खेळात सातत्य राखले.
या सातत्याचे फळ म्हणूनच आज मुंबई उपनगर (पूर्व) कबड्डी संघात त्याची निवड झाली आहे आणि ५२ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आत्मविश्वासाने उतरण्यास तो सज्ज झाला आहे. त्याच्या या यशाचा आनंद पांग्रड गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा आहे.
आगामी स्पर्धेसाठी विराजला मनःपूर्वक शुभेच्छा! पांग्रड ग्रामस्थ यांनी दिल्या आहेत तसेच त्याच्या खेळात अधिकाधिक चमक येवो आणि एक दिवस महाराष्ट्राचा व भारताचा मान उंचावणारा जागतिक दर्जाचा खेळाडू बनो हीच प्रार्थना! येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


