Maharashtra Election 2025: 1–3 डिसेंबर Dry Day जाहीर; राज्यभर दारूविक्री बंद
महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी राज्यातील निवडणूक संबंधित क्षेत्रांमध्ये 1, 2 आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मद्यविक्री बंद (Dry Day) राहणार आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत राहावी, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रातील सर्व देशी-विदेशी किरकोळ मद्य दुकाने, बार, माडी विक्री अनुज्ञप्ती तिन्ही दिवशी संपूर्ण दिवस बंद राहतील.
🔹 ड्राय डे तपशील (Dry Day Schedule 2025)
-
1 डिसेंबर 2025 – मतदानाच्या आदल्या दिवशी
-
2 डिसेंबर 2025 – मतदानाचा दिवस
-
3 डिसेंबर 2025 – मतमोजणीचा दिवस
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की या आदेशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 54 व 56 अंतर्गत संबंधित परवानाधारकांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द होऊ शकते.
ही माहिती निवडणूक क्षेत्रातील नागरिकांनी व परवानाधारकांनी नोंद घ्यावी.


