Ratnagiri: जिंदल कंपनी जेटी बांधकामाला स्थगिती

0
88
जिंदल कंपनी जेटी बांधकामाला स्थगिती
जिंदल कंपनी जेटी बांधकामाला स्थगिती

रत्नागिरी- जिंदल कंपनीकडून मिरवणे परिसरात आणखी एक जेटी उभारण्याचे काम सुरू असल्याने , त्याचा त्रास भविष्यात मच्छीमारांना होणार आहे . त्यामुळे मच्छीमारांच्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने जेटीचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत .https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मराठवाड्यातील-मराठा-सम/

जिंदल कंपनीने सीआरझेडचे उल्लंघन करीत समुद्र व खाडीदरम्यान तब्बल २५० एकर पर्यंत भराव टाकला आहे . याठिकाणी जेटीची उभारणी केली जात आहे . यापट्ट्यात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर परिणाम होणार आहे . त्याचप्रमाणे खाडीमध्ये ये जा करणेही कठीण होणार आहे . त्यामुळे जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था , पडवे मच्छिमार सहकारी संस्था , आरमान मच्छीमार सहकारी संस्था पडवे गुहागर , आदर्श मच्छीमार सहकारी संस्था पडवे , हनुमान मच्छीमार सहकारी संस्था नवानगर काताळे , खोतबाबा मच्छीमार सहकार संस्था कुडली , सागारी आगर हेदवी गट मच्छीमारी सह . संस्था साखरी आगर , वेळणेश्वर मच्छीमार सहकारी संस्था वेळणेश्वर या संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता .

कंपनी सीआरझेडचे उल्लंघन करीत आहेत . त्याचप्रमाणे जयगड येथून गॅस वाहतूक केली जात आहे . त्यामुळे भविष्यात गॅसची गळती होऊन अपघात होण्याचीही शक्यता वर्तवली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत मच्छीमार सोसायट्ट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली . यात जेटीचे काम पुढील आदेश होईपर्यंत थांबवण्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here