बंगळुरूमध्ये इनडोअर केसर शेतीचा नवा ट्रेंड ; ३०+ शेतकऱ्यांची आधुनिक प्रयोगशील शेतीला सुरुवात

0
8
बंगळुरूमध्ये इनडोअर केसर शेतीचा नवा ट्रेंड
बंगळुरूमध्ये इनडोअर केसर शेतीचा नवा ट्रेंड

बंगळुरूमध्ये इनडोअर केसर शेतीचा नवा ट्रेंड; ३० + शेतकऱ्यांची आधुनिक प्रयोगशील शेतीला सुरुवात

बंगळुरू : पारंपरिकरित्या डोंगराळ भागात केली जाणारी केसर शेती आता बंगळुरूसारख्या महानगरातही वेगाने वाढताना दिसत आहे. शहरातील ३० पेक्षा जास्त लोकांनी इनडोअर केसर शेती (Indoor Saffron Farming) सुरू केली असून, हा ट्रेंड कर्नाटकात जलद गतीने पसरत आहे.

अलीकडील काळात बाजारात मिळणाऱ्या केसरात साखर किंवा इतर पदार्थांचे भेसळ प्रमाण वाढल्याने ग्राहकांमध्ये शुद्ध, स्थानिक आणि ट्रॅस करता येणाऱ्या केसराची मागणी वाढली आहे. यामुळे इनडोअर केसर शेती हा एक नवा पर्याय म्हणून अनेकांनी स्वीकारला आहे.

कर्नाटक सॅफ्रॉन फार्मर्स असोसिएशन (KSFA) चे संस्थापक आणि मुख्य सचिव लोकश वोलिविन यांनी माहिती देताना सांगितले की,
“बंगळुरू डोंगराळ प्रदेश नसला तरी येथील उंची, हवामानातील स्थिरता आणि नियंत्रित तापमान हे केसर शेतीस अनुकूल ठरते. त्यामुळे शहरात देखील यशस्वी इनडोअर शेती करणे शक्य झाले आहे.”

बंगळुरूनंतर कर्नाटकातील श्रीनगर, कुनिगल आणि तुमकूर येथेही ही आधुनिक पद्धत वापरली जात आहे. कमी जागेत, नियंत्रित वातावरणात केसर उत्पादन मिळू शकत असल्याने नव्या पिढीतील तरुण, आयटी प्रोफेशनल आणि स्टार्टअप क्षेत्रातील लोक मोठ्या प्रमाणावर या शेतीकडे वळू लागले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, इनडोअर तंत्रज्ञानाच्या मदतीने केसराची गुणवत्ता उच्च राहते, उत्पन्न स्थिर मिळते आणि मार्केटमध्ये शुद्ध, स्थानिक उत्पादनाला अधिक किंमत मिळते. त्यामुळे कर्नाटकात केसर शेती एक लाभदायक आधुनिक शेती मॉडेल म्हणून उदयास येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here