RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती ; ऑनलाइन अर्ज सुरू

0
15
RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती; ऑनलाइन अर्ज सुरू
RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती; ऑनलाइन अर्ज सुरू

RITES लिमिटेडमध्ये 400 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मेगा भरती ; ऑनलाइन अर्ज सुरू

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम RITES लिमिटेड (Rail India Technical and Economic Service) यांनी ४०० सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, S&T, मेटलर्जी, केमिकल, आयटी, फूड टेक्नॉलॉजी आणि फार्मा यांसारख्या विविध अभियांत्रिकी शाखांमधील पात्र उमेदवारांना ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

m

हे पण वाचा चंद्रनगर शाळेत संविधान दिन साजरा

या भरतीसाठी पात्र अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार २६ नोव्हेंबर २०२५ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत RITES च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. देशातील अव्वल तांत्रिक सल्लागार संस्थेमध्ये करियर करण्याची ही मोठी संधी आहे.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू: २६ नोव्हेंबर २०२५

  • शेवटची तारीख: २५ डिसेंबर २०२५

भरतीची वैशिष्ट्ये:

  • एकूण पदे: 400

  • पदनाम: Assistant Manager (विविध शाखा)

  • विभाग: Civil, Mechanical, Electrical, S&T, Metallurgy, Chemical, IT, Food Tech, Pharma

  • संस्था: RITES Ltd (A Navratna PSU, Ministry of Railways)

RITES लिमिटेड त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवा, रेल्वे प्रकल्प, मेट्रो प्रोजेक्ट्स आणि आंतरराष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्सीसाठी ओळखले जातात. त्यामुळे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रतिष्ठेची आणि उत्तम करिअर संधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here