परुळे:– सद्गुरु प्रासादीक भजन मंडळ गवाणवाडी हे भाग्यवान विजेते ठरले. भजणी मंडळांना साहित्य वाटप योजनेत, या मंडळाला सिंधुदुर्गनगरी येथे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री मा.रविंद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-मित्र-बनून-संवाद-साधल्या/
यावेळी भजन मंडळाचे श्री विजय परब, संतोष परब यांनी साहित्य स्वीकारले. जि.प.स्व.निधीतून भजन मंडळांना सहाय्य म्हणुन साहित्य देण्याची योजना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली. यावेळी पहिल्या टप्प्यान 250 मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. लकी ड्रॉ तून तीन हजार मंडळांच्या अर्जामधुन या मंडळांची निवड करण्यात आली.