Kokan: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करा

0
57
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार

सिंधुदुर्ग – राज्य शासनाने, दिनांक १९.९.२०२३ पासून सुरू होणा-या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि. १५.९.२०२३ पर्यंत अर्ज करावा. स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी भाग घ्यावा, असे आवाहन मा. मंत्री सांस्कृतिक कार्य, सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसटी-कर्मचाऱ्यांच्या-य/

मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्हयातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लक्ष, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लक्ष व तृतीय क्रमांकास रुपये १लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. ४.०७.२०२३ चा शासन निर्णय व दिनांक ३०.०८.२०२३ च्या शासन शुध्दीपत्रकात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमुद केले आहेत तसेच सोबत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here