किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस उलटली! सहा विद्यार्थी जखमी

0
2
किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस उलटली! सहा विद्यार्थी जखमी
किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस उलटली! सहा विद्यार्थी जखमी

किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस उलटली! सहा विद्यार्थी जखमी

रायगड | प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातून किल्ले रायगड दर्शनाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीची खासगी मिनीबस नांदगाव बुद्रुक येथे पलटी झाली. या अपघातात सहाजण जखमी झाले असून यामध्ये चार विद्यार्थिनी, शिक्षक व चालकाचा समावेश आहे.
अक्षरा अजय ढोवळे (वय 16), आदिती रवींद्र खेरमोडे (वय 16), आदिती दीपक खाडे (वय 16), सिद्धी दीपक ढोवळे (वय 16), चालक योगेश वसंतराव जाधव (वय 35), शिक्षक जगन्नाथ विश्वास येवले (वय 45) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रहिवासी आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालय महाड येथे उपचार करण्यात आले असून त्यापैकी आदिती खेरमोडे ही गंभीर जखमी असल्याने तिला सिटीस्कॅनसाठी माणगाव येथे पाठविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here