शिवसेना पक्ष व आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते,प्रगतशील शेतकरी संतोष गाडगे यांची उपस्थिती
ओरोस : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रु रक्कम प्रलंबीत आहे.गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना हि पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आज आमदार वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-आगामी-निवडणुकांमध्ये-शि/
आंबा काजू शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे! या गद्दार सरकारचे करायचे काय?खाली डोके वर पाय! कोण म्हणतो देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाय? अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास संपूर्ण जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला तसेच त्यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
याप्रसंगी वेतोरेचे प्रगतशील शेतकरी संतोष गाडगे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,राजु शेट्ये,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,अतुल बंगे,माजी उपसभापती जयभारत पालव, कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,बंडू ठाकूर, भालचंद्र दळवी, रुपेश आमडोसकर,सिद्धेश राणे,निसार शेख,मज्जीद बटवाले, इमाम नावलेकर, चंदू परब,तेजस सावंत, प्रमोद कावले,दिवा पारकर,वैदही गुडेकर,दिव्या साळगावकर,सुनील सावंत,हनुमंत सावंत,वैभव मलांडकर,सचिन राणे, श्रीकांत राणे,आनंद मर्गज यांसह जिल्ह्यातील आंबा व काजू पिक विमाधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.