शिवसेनेचा बाण सुसाट सुटलाय, त्यामुळे आमचा विजय निश्चित.
सावंतवाडी| प्रतिनिधी
कोणी विरोधात असले तरी रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा बाण सुसाट सुटला आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असा दावा प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार अजय गोंदावळे यांनी आज येथे केला. द
रम्यान निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपल्या पाठिशी सावंतवाडीकर जनता ठामपणे उभी राहील, यात काहीली शंका नाही. त्यामुळे आपल्या सोबत असलेल्या पूजा अरवारी व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता कविटकर या सर्वांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून आज सावंतवाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर श्री. गोंदावळे बोलत होते. यावेळी काही झाले तरी आम्ही गोंदावलेच्या पाठिशी आहोत, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.


