भोरमध्ये फडणवीसांची जाहीर सभा

भोर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप तसेच सर्व नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भोर येथे जाहीर सभा पार पडली.
सभेला मोठी उत्स्फूर्त गर्दी झाली असून, भाजपच्या प्रचाराला या सभेमुळे वेग मिळाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. या प्रसंगी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे भोर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय तापमान अधिकच वाढले आहे.


