बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रदूषण नियमांचे उल्लंघन; बीकेसी साइटला बीएमसीची नोटीस 

0
101

बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रदूषण नियमांचे उल्लंघन; बीकेसी साइटला बीएमसीची नोटीस 

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बीकेसी येथील बांधकाम स्थळी हवेच्या प्रदूषणासंबंधी नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) ‘शो कॉज’ नोटीस बजावली आहे. तपासणीदरम्यान धूळ नियंत्रणासाठी आवश्यक फॉगिंग मशीन, वॉटर स्प्रिंकलर, कव्हर आणि सुरक्षा भिंती योग्यप्रकारे कार्यरत नसल्याचे दिसले.

हे पण वाचा वृद्धेचा शाळेच्या बसखाली दुर्दैवी मृत्यू

बांधकाम साहित्य उघड्यावर साचलेले असून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. बीएमसीच्या इन्फोर्समेंट सेलने केलेल्या आकस्मिक तपासणीमध्ये ही अनियमितता उघड झाली.

नियमांचे पालन न केल्यास प्रकल्पावर कारवाई किंवा काम बंद करण्याची शक्यता असल्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे. NHSRCL मात्र धूळ नियंत्रणासाठी अतिरिक्त उपाय सुरू केल्याचे सांगितले.

बीकेसीसारख्या व्यस्त परिसरात पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कठोर उपाय अनिवार्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here