महिंद्रा आणि पंजाब नॅशनल बँकचा वाहन वित्तपुरवठासाठी सामंजस्य करार

0
127
महिंद्रा आणि पंजाब नॅशनल बँकचा वाहन वित्तपुरवठासाठी सामंजस्य करार
महिंद्रा आणि पंजाब नॅशनल बँकचा वाहन वित्तपुरवठासाठी सामंजस्य करार

महिंद्रा आणि पंजाब नॅशनल बँकचा वाहन वित्तपुरवठासाठी सामंजस्य करार

मुंबई : इलेक्ट्रिक कमर्शियल वाहन क्षेत्रातील अग्रणी कंपनी महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेड  आणि देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँक  यांच्यात वाहन वित्तपुरवठा सोल्यूशन्ससाठी सामंजस्य करार झाला आहे.

हे पण वाचा डुकाटीने भारतात स्ट्रीटफायटर व्ही२ (V2) लाँच केली  

अलीकडेच एमएलएमएल ने 3 लाख व्यावसायिक ई-व्हेईकल  विक्रीचा विक्रम पार केला आहे. या सहयोगामुळे पीएनबीच्या १०,०००+ शाखांमधून, विशेषतः ग्रामीण व निम-शहरी भागात, ग्राहकांना कस्टमाइज्ड कर्ज योजनांसह सुलभ आणि वेगवान वित्तपुरवठा उपलब्ध होणार आहे.

एमएलएमएमएलच्या एमडी आणि सीईओ सुमन मिश्रा यांनी सांगितले की, पीएनबीसोबतची भागीदारी ग्राहकांना अधिक सुलभ, परवडणारी आणि आधुनिक मोबिलिटी उपलब्ध करून देणारी ठरेल.

पीएनबीचे एमडी आणि सीईओ अशोक चंद्रा यांनी सांगितले की, या करारामुळे पर्यावरणपूरक वाहतूक उपाय अधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि देशात ई-व्हेईकलचा अवलंब वेगाने होईल.

ही भागीदारी लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमध्ये नावीन्य आणण्यास आणि ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा अनुभव अधिक सुलभ करण्यास मदत करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here