
रायगड जिल्ह्यात 70.26 टक्के मतदान; माथेरान आघाडीवर, पेण व रोहा उत्साही प्रतिसाद
रायगड – नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात आज (२ डिसेंबर) सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत एकूण ७०.२६ टक्के मतदान झाली. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार माथेरानमध्ये सर्वाधिक ८५.३५% मतदान नोंदवले गेले असून पेण (७२.८२%), करजात (७२.३७%), रोहा (७१.९२%) या नगरपरिषदांनीही उत्साहवर्धक मतदानाचा टक्का कायम ठेवला.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे आजचे कार्यक्रम
जिल्ह्यातील एकूण २,३७,५०३ मतदारांपैकी १,६६,८५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदारांचे प्रमाण ८३,९८६ असून महिला मतदारांनी ८२,८७१ मतांची नोंद केली.
नगरपरिषदनिहाय मतदानाचा आढावा (मुख्य ठळक मुद्दे):
-
माथेरान – ८५.३५% (जिल्ह्यात सर्वाधिक)
-
पेण – ७२.८२%
-
करजात – ७२.३७%
-
रोहा – ७१.९२%
-
महाड – ७१.०३%
-
अलिबाग – ७०.३१%
-
मुरुड-जंजिरा – ७३.८९%
-
श्रिवर्धन – ६६.२३%
-
खोपोली – ६८.५२%
-
उरण – ६७.९२%
मतदारांनी शांततेत आणि अनुशासनाने मतदान केले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सर्व मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांचे मतदानाबद्दल आभार मानत लोकशाही बळकट केल्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली.
रायगड जिल्ह्यातील शांततामय व उत्साही मतदानामुळे आता निकालावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

