Goa: 1.92 कोटींची बेहिशोबी मालमत्ता; गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या महाव्यवस्थापकाविरोधात CBI कडून गुन्हा

0
379
गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या महाव्यवस्थापकाविरोधात CBI कडून गुन्हा
गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या महाव्यवस्थापकाविरोधात CBI कडून गुन्हा

मुबंई- बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या जहाज बांधणी कंपनीच्या माजी मुख्य महाव्यवस्थापकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या गोव्यातील भ्रष्टाचारविरोधी शाखेने एफआयआर दाखल केला आहे. महाव्यवस्थापकावर 1.92 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.
महाव्यवस्थापक मनोरंजन खुंटिया यांच्याविरोधात 22 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. खुंटिया 1995 साली जीएसएलमध्ये रुजू झाले आणि 31 मे 2023 रोजी मुख्य महाव्यवस्थापक (एचआर आणि प्रशासक) म्हणून निवृत्त झाले.https://sindhudurgsamachar.in/kokan-कलंबिस्त-ता-सावंतवाडी-ये/

1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान जीएसएल, गोवा येथे कार्यरत असताना, खुंटियाने बेकायदेशीररित्या आर्थिक फायदा मिळवला आणि स्थावर व जंगम दोन्ही मालमत्ता जमवली, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. खुंटिया यांच्याकडे 1.92 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असून, ती त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 66 टक्के आहे. खुंटिया याबाबत हिशेब देऊ शकले नाहीत, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

एफआयआरनुसार, खुंटिया यांनी कथितरित्या विकत घेतलेल्या मालमत्तेमध्ये ओडिशातील निवासी घर, 2018-19 मध्ये दाबोळी, गोवा येथे 370 चौरस मीटर भूखंडाची खरेदी आणि दाबोळी येथील भूखंडावर निवासी घर बांधणे यांचा समावेश आहे. खुंटिया विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 13 (2) सह 13 (1) (ई) आणि कलम 13 (2) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 13 (1) (ब) नुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.

खुंटिया सध्या ओडिशात असून, माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्याची मला माहिती असल्याचे त्यांनी इंडियन एक्सप्रेला माहिती दिलीय. गोव्यात परत आल्यावर सर्व व्यवहार आणि प्रश्नांचेस्पष्टीकरण देईन, असेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here