पवित्र स्थळाचे आध्यात्मिक महत्व अधोरेखित – बाबुराव धुरी

0
146

पवित्र स्थळाचे आध्यात्मिक महत्व अधोरेखित – बाबुराव धुरी

मांगेली देऊळवाडी येथे देणगी कुपनचे अनावरण

दोडामार्ग | सुमित दळवी
मांगेली देऊळवाडी येथील श्री सातेरी केळबाय रवळनाथ बारा पंचायतन देवस्थानचा चौथा जत्रोत्सव आणि भव्य देणगी कुपन अनावरण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला. सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांनी वेढलेल्या देऊळवाडी परिसरात सकाळीच पवित्र वातावरण निर्माण झाले होते. मंद वारा, गर्द झाडी आणि शांत वातावरणामुळे सोहळ्याला अधिक दिव्यता लाभली.
हे पण वाचा हर्णे बंदरात कोळंबीची आवक घटली

मंदिराच्या उर्वरित बांधकाम व सुशोभीकरणासाठी युवा वर्गाने राबविलेल्या या अभिनव देणगी कूपन उपक्रमाचे उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी पत्रकार सुमित दळवी ठाकरे गटाचे मिलिंद नाईक विजय जाधव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विलास सावळ देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शून्यातून उभे केलेल्या या मंदिराच्या पुढील विकासासाठी देणगी कूपन योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेत भाग्यशाली विजेत्यांसाठी चार चाकी वाहनासह एकूण ११ आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे मंदिर विकासाला आर्थिक गती मिळेल, असे आयोजकांनी सांगितले मान्यवरांनी देवस्थानच्या कार्याचे कौतुक करत गावातील एकोप्याची परंपरा व सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या पवित्र स्थळाचे आध्यात्मिक महत्व अधोरेखित केले अनावरण सोहळ्यानंतर सर्वांनी दर्शन घेत देवाच्या आशीर्वादाची अनुभूती घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here