शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकरनिविदा मंजूर होऊनही घाट रस्त्याच्या दुरूस्तीला सुरवात झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने ३० ऑक्टोबरला आंदोलन
कणकवली-: कोल्हापूर-सिंधुदुर्ग जोडणाऱ्या करूळ घाट रस्त्याची दूरवस्था झाली आहे. निविदा मंजूर होऊनही घाट रस्त्याच्या दुरूस्तीला सुरवात झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने ३० ऑक्टोबरला आंदोलन छेडले जाणार आहे. यात वैभववाडी ते तळेरे अशी पदयात्रा काढून शासनाने लक्ष वेधल जाईल अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज दिली. श्री. पारकर यांनी येथील विजय भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके आदी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-डाक-चावडीच्या-माध्यमात/