डॉ.संजिव लिगवत:डागडुजीचे काम लवकरात लवकर सूरू करण्याची मागणी
वेंगुर्ला ता.१८-: डच वखार सिधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी एक महत्त्वाची वास्तू आहे. शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून डच वखार डागडुजी व दुरूस्तीसाठी पत्र व्यवहार करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी सुमारे ३ कोटी रूपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. त्यामुळे डच वखारीच्या डागडुजीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, असे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे कार्यालय रत्नागिरी येथे पुरातत्त्व विभागाचे कनिष्ठ अभियंता शांताराम खेकडे यांच्याकडे जनसेवा प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत यांनी निवेदन देवून मागणी केली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-नादुरुस्त-असलेल्या-तळेर/