शिरूरकासारमध्ये १६-१७ डिसेंबरला ७वे सिंदफणा साहित्य संमेलन

0
127

शिरूरकासारमध्ये १६-१७ डिसेंबरला ७वे सिंदफणा साहित्य संमेलन

शिरूरकासार, जि. बीड — “माय मराठीचा जागर” या घोषवाक्याने सजलेले ७ वे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन येत्या १६ आणि १७ डिसेंबर रोजी शिरूरकासार येथे पार पडणार आहे. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य साहित्य- संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून सिंदफणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि एकलव्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

हे पण वाचा e paper sindhudurgsamachar

या जिल्हास्तरीय संमेलनात तालुक्यातील ४० हून अधिक शाळा सहभाग नोंदवणार असून विविध सांस्कृतिक, साहित्यिक, भाषिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी दोन दिवसांच्या कार्यक्रमाला रंगत येणार आहे. तालुक्यातील तहसिल कार्यालय, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग यांसह अनेक सरकारी यंत्रणांनीही संमेलनासाठी सहकार्य केले आहे.

संमेलनात सिंदफणा शेती गौरव, शिक्षक गौरव, सेवा गौरव, कला गौरव आणि वक्ता गौरव या पुरस्कारांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाईल.

संमेलनाचे नियोजन संजय तुपे, सिद्धार्थ सोनवणे, गोकुळ पवार यांच्यासह मोठ्या कार्यकर्ता संघाने केले असून मराठी भाषा, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक साहित्यपरंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या संमेलनातून होणार आहे.

१६-१७ डिसेंबरला होणाऱ्या या साहित्य सोहळ्यासाठी शिरूरकासार परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here