प्रतिभासंपन्न संगीतकार सतीशचंद्र दत्तात्रय मोरे यांचे २ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री प्रदीर्घ आजाराने निधन!

0
139
प्रतिभासंपन्न संगीतकार सतीशचंद्र दत्तात्रय मोरे यांचे २ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री प्रदीर्घ आजाराने निधन!
प्रतिभासंपन्न संगीतकार सतीशचंद्र दत्तात्रय मोरे यांचे २ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री प्रदीर्घ आजाराने निधन!
प्रतिभासंपन्न संगीतकार सतीशचंद्र दत्तात्रय मोरे यांचे २ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री प्रदीर्घ आजाराने निधन!


मुंबई l संगीत प्रतिनिधी  : ज्येष्ठ आणि हरहुन्नरी संगीतकार सतीशचंद्र दत्तात्रय मोरे यांचे प्रदीर्घ आजाराने २ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री माउंट मेरी चर्चजवळील शांती आवेदना येथे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या स्नेही तृप्ती करलकर यांनी दिली. संवेदनशील, निस्वार्थी आणि दिलखुलास स्वभावामुळे संगीतविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या प्रतिभावंताच्या जाण्याने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रभावी कवितांना ताकदीने सुरावट देण्याची अनोखी क्षमता सतीशचंद्र मोरे यांच्या कार्याची ओळख ठरली. त्यांनी वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, साधना सरगम, सुरेश वाडकर, कैलाश खेर, शान, शंकर महादेवन, स्वरूप खान, आनंदी जोशी, नेहा कक्कर यांसारख्या अनेक नामवंत गायकांसोबत काम केले होते. मालिकांची शीर्षकगीते, जाहिरातींच्या जिंगल्स, तसेच स्वतंत्र संगीत रचना अशा विविध माध्यमांमध्ये ते सतत सक्रिय होते.

संगीताची ओढ बालपणापासूनच असली तरी सुरुवातीला त्यांनी अपना बँक येथे नोकरी केली. नंतर टाटा कंपनीकडूनही रोजगाराची संधी मिळाली होती; पण संगीताची ध्यासाने त्यांनी हा मार्ग न स्वीकारता पूर्णवेळ संगीतकार होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांना हार्मोनियम आणि मेंडोलिन वादनाची आवड होती; हाच संस्कार मनात बाळगत सतीशचंद्र यांनीही संगीताची वाट निवडली.

वडाळ्यातील ज्ञानेश्वर विद्यालयात ते काही काळ संगीत शिक्षक आणि कार्यक्रम संचालक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी रचनाकार म्हणून स्वतंत्र प्रवासाला सुरुवात केली. संघर्ष, जिद्द आणि सृजनशीलतेच्या जोरावर त्यांनी संगीतविश्वात मानाचे स्थान मिळवले.

सतीशचंद्र मोरे यांचे निधन म्हणजे एका बहुआयामी, अभ्यासू आणि संवेदनशील कलाकाराची पोकळी—ज्याची भर पडणं कठीण आहे. संगीतविश्व, सहकारी कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

One attachment  •  Scanned by Gmail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here