मालवण ता.२२-:
मच्छीमाराचा इंधनावरील खर्च कमी व्हावा यासाठी एलपीजी म्हणजेच गॅसवर चालणाऱ्या नौका इंजिनाची (आऊट बोट मशीन) चाचणी नुकतीच मत्स्य व्यवसाय विभागाकडून मालवण व देवगड या ठिकाणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या अतिशय यशस्वी झाल्या असून लवकरच सद्यस्थितीत वापरत असलेल्या पेट्रोल अथवा केरोसीन इंजिनाचे रूपांतर एलपीजी तसेच सीएनजी मध्ये करण्यासाठीचे तंत्रज्ञान सर्वसामान्य मच्छीमाराला कमीत कमी किमतीत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे