विधानसभा अपडेट्स: 

0
156
विधानसभा अपडेट्स: 
विधानसभा अपडेट्स: 

विधानसभा अपडेट्स: 

पुणे डीपी, भिवंडी डम्पिंग ग्राउंड आणि मुंबईतील भोगवटा निर्णयावर मंत्री सामंतांची माहिती

मुंबई l  l प्रतिनिधी

विधानसभेत आज नगरविकास विभागाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होताच मंत्री उदय सामंत यांनी पुणे, भिवंडी आणि मुंबई महानगर क्षेत्रातील सुरू असलेल्या प्रक्रियांची सविस्तर माहिती दिली.

पुणे विकास आराखडा (डीपी)
लोहगावसह ११ नवीन गावांचा समावेश असलेला पुणे महापालिकेचा विकास आराखडा अद्याप अंतिम झालेला नसल्याचे सामंत यांनी सांगितले. कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम डीपी जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भिवंडीतील नवे डम्पिंग ग्राउंड
भिवंडी शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या तातडीच्या प्रश्नावर उत्तर देताना सामंत यांनी सांगितले की, सर्व्हे क्र. 130 आणि 139 ही ठिकाणे नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी निश्चित करण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार शासन प्रस्ताव मंजूर करणार आहे.

मुंबईतील २० हजार इमारतींना भोगवटा देण्याचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई महानगर क्षेत्रातील २० हजार इमारतींना भोगवटा मंजूर केल्याची माहितीही सामंत यांनी सभागृहात दिली. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेली मुंबईकरांची मागणी पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे ४ ते ५ लाख सदनिका, म्हणजेच जवळपास २० लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना तत्काळ अंमलबजावणीचे आदेश देण्यात आल्याचेही सामंत यांनी नमूद केले.

या निर्णयांमुळे पुणे, भिवंडी आणि मुंबईतील नागरी विकास प्रक्रियेला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here