मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0
174
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

ठाणे, (जिल्हा परिषद, ठाणे)l  l प्रतिनिधी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमामध्ये ह. भ. प. निरुपणकार श्री. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांच्या कीर्तन कार्यक्रमास जिल्ह्यातील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,    ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आणि राज्यमंत्री ग्रामविकास पंचायत राज योगेश कदम  यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम अंतर्गत जनजागृती कार्यक्रम म्हणून आज दि. ११ डिसेंबर, २०२५ रोजी, सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत शिवाजीराव जोंधळे कॉलेज, पार्थसारथी पेट्रोल पंपाजवळ, महामार्ग क्रमांक ३ लगत, मुक्काम आसनगाव, ता. शहापूर, जि. ठाणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

“ग्रामविकासाची खरी ताकद शासकीय योजना नियोजन बद्ध पध्दतीने राबविण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार महत्त्वाचे आहे. आरोग्य, सौरऊर्जा, अंगणवाडी, शाळा वा रस्ते ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान यशस्वी करायचे असेल तर गावकऱ्यांनीच एकदिलाने पुढे यायला हवे.” — इंदुरीकर महाराज

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, प्रकल्प संचालक पंडित राठोड, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्य सहसमन्वयक यास्मीन शेख, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्य सहसमन्वयक रेश्मा शेख, शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी. एच. राठोड, भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गोविंद खामकर, मुरबाड गट विकास अधिकारी लता गायकवाड, सरपंच रविना कचरे, उपसरपंच राहुल चंदे, ग्रामपंचायत अधिकारी उदयराज शेळके, अधिकारी- कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदुरीकर महाराजांचे प्रभावी कीर्तन
इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या नेहमीप्रमाणे प्रभावी, विनोदी व संदेशप्रधान शैलीतून ग्रामविकास, सामाजिक एकजूट, शासकीय योजनांचा योग्य लाभ, शिक्षण, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, तसेच प्रशासनावरील विश्वास याबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यांच्या वक्तृत्वाने उपस्थित नागरिकांचे मनोरंजन तर झालेच, पण त्यासोबतच विकास प्रक्रियेत नागरिक सहभागाचे महत्त्वही अधोरेखित झाले.

ग्रामपंचायत पातळीवर चालू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यास ही सभा उपयुक्त ठरले आहे.

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला बचत गट, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, युवक मंडळे तसेच अनेक ग्रामस्थ नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या संकल्पना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याचे समाधान जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उद्देश म्हणजे शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा दृढ करणे. इंदुरीकर महाराजांच्या मार्मिक शैलीतून ग्रामस्थांमध्ये जनजागृती अधिक बळकट झाली असून अभियानाला आवश्यक चालना मिळाली आहे.”

संपूर्ण कार्यक्रम जिल्हा परिषद, ठाणे, पंचायत विभाग, शहापूर पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या संपन्न झाला. उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here