Kokan: मुद्रांक विक्रीच्या नवीन धोरणाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते यांचे एकदिवसीय मुद्रांक विक्री बंद आंदोलन

0
35
राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते यांचे एकदिवसीय मुद्रांक विक्री बंद आंदोलन
राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते यांचे एकदिवसीय मुद्रांक विक्री बंद आंदोलन

कणकवली– ता.२६ : मुद्रांक विक्रेते यांचेकडून विकले जाणारे ५०० व १०० रुपयांचे जनरल मुद्रांक रद्द करुन सदरचे मुद्रांक हे बँकेमार्फत व फ्रँकिंगव्दारे विक्री करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे, असे सोशल मिडीया व वृत्तपत्रातून समजते. सदरच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ४५०० मुद्रांक विक्रेते हे बेकार होणार आहेत. त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून या मुद्रांक विक्रीच्या नवीन धोरणाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते यांनी एकदिवसीय मुद्रांक विक्री बंद आंदोलन करण्याचे ठरविलेले आहे. त्या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा मुद्रांक विक्रेता व दस्तलेखनिक संघटना ३० ऑक्टोंबरला बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदन दुय्यम निबंधक सुनील बिचुकले, कणकवली तहसीलदार यांना देण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-मालवणात-बंदर-विभागाची-बे/

जर शासनाने नवीन मुद्रांक विक्री प्रणालीचा अवलंब केल्यास त्यामध्ये राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांना सामावून घेवून नव्या पध्दतीचा अवलंब करावा. त्यामुळे आमच्या वयोमानानुसार निर्माण होणारा उपजीविकेचा प्रश्न सुध्दा निकाली होण्यास मदत होईल याची नोंद घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांची यांनी केली आहे. याबाबत निवेदन कणकवली प्रभारी दुय्यम निबंधक सुनील बिचुकले यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मुद्रांक विक्रेते सुनील रेपाळ, भाग्यलक्ष्मी साटम, संतोष जाधव, श्रीकृष्ण परब , महेश पवार, विनायक मठकर, तन्वी मोदी, मंगेश सावंत आदीसह मुद्रांक विक्रेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here