⭐ आपट्याच्या पानावर तंबाखू विरोधी संदेश देत अनोखी जनजागृती
बांदा,ता.२६: आपट्याच्या पानावर तंबाखू विरोधी संदेश देत बांदा येथील केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी दसऱ्याच्या दिवशी अनोखा उपक्रम राबवला आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/kokan-मुद्रांक-विक्रीच्या-नवी/
महाराष्ट्र शासनामार्फत तंबाखूमुक्त शाळा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी शाळा महाविद्यालये यामध्ये चालू आहे. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक शाळा तंबाखू मुक्त शाळा जाहीर झाल्या आहेत. शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे बालवयातच देण्यात येत असून विद्यार्थ्यांकरवी अनेक अनेक कुटुंबे व्यसनमुक्तीही बनविण्यात येत आहेत. दसरा सणाच्या निमित्ताने बांदा शाळेतीलविद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर ‘व्यसनमुक्त भारत, सदृढ भारत’ “तंबाखू सोडा, कर्करोग टाळा” “तंबाखूचा घास, जीवनाचा नाश” अशा प्रकारच्या घोषणा लिहून व्यसनमुक्ती बाबत जनजागृती केली. या वि