खारेपाटण आठवडा बाजारात सहा मोबाईलची चोरी, एकच खळबळ

0
121
खारेपाटण आठवडा बाजारात सहा मोबाईलची चोरी, एकच खळबळ
खारेपाटण आठवडा बाजारात सहा मोबाईलची चोरी, एकच खळबळ

खारेपाटण आठवडा बाजारात सहा मोबाईलची चोरी, एकच खळबळ

शनिवार हा खारेपाटणचा आठवडा बाजार दिवस असल्याने दशक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत येत असतात. मात्र आज शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे एकाच वेळी सहा मोबाईल हँडसेट चोरीस गेल्याची घटना घडल्याने बाजारात खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती स्थानिक भाजी विक्रेता व्यापारी किशोर पिसे यांनी दिली. चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये यशवंत रघुनाथ कोकाटे (बांदिवडे), संतोष सूद (तळगाव), बापू हरयाण (रिक्षावाले, केळवली) यांच्यासह पंचक्रोशीतील दोन महिला व एक पुरुष ग्राहक अशा एकूण सहा जणांचा समावेश आहे.

दरम्यान, चोरीची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस प्रमुख मिलिंद देसाई यांच्यासह सहकारी पोलिसांनी तातडीने आठवडा बाजारात भेट देत घटनास्थळी पाहणी केली. तसेच मोबाईल चोरीच्या घटनेबाबत सविस्तर माहिती घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here