मळेवाड कोंडुरेत ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम

0
203
मळेवाड कोंडुरेत ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम
मळेवाड कोंडुरेत ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम

मळेवाड कोंडुरेत ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम

सावंतवाडी l प्रतिनिधी :

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या वतीने गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ राणी पार्वती देवी विद्यालय, मळेवाड (जिल्हा परिषद केंद्र शाळा क्रमांक १) येथे सरपंच मिलन पार्सेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बाटल्या, तुकडे, खेळणी व इतर प्लास्टिक वस्तू शाळेत जमा करायच्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने जमा केलेल्या प्लास्टिकच्या प्रमाणानुसार त्याला साखर देण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याचा आणि प्लास्टिक कचरा संकलनाला चालना देण्याचा उद्देश आहे.

याशिवाय गावातील ज्या शाळेमध्ये सर्वाधिक प्लास्टिक संकलन होईल, त्या शाळेला सामूहिक बक्षीस म्हणून रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन ग्रामपंचायततर्फे गौरविण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली. तसेच हा उपक्रम पुढील काळात गावातील ग्रामस्थांसाठीही राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे गावातील प्लास्टिक कचरा गोळा होण्यास मोठी मदत होणार असून गाव स्वच्छ व कचरामुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच मिलन पार्सेकर यांनी केले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, सानिका शेवडे, मुख्याध्यापक शितल वेंगुर्लेकर, शिक्षक संजय बांबुळकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रिया नाईक, उपाध्यक्ष दीया चौगुले, प्रभाकर पार्सेकर, संतोष पार्सेकर, भाऊ मुरकर, भाऊ काळोजी, महिला पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here