गुहागर समुद्रकिनाऱ्यास ब्ल्यू फ्लॅग मानांकन
गुहागर समुद्रकिनाऱ्यास ब्ल्यू फ्लॅग मानांकनाचा पायलट प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली असून, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या गुहागरला आता आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नेण्याची संधी निर्माण झाली आहे. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहकार्याने गुहागरला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवायचे आहे, अशा भावना ब्ल्यू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्पाचे सहाय्यक दीपक विचारे आणि नरेश पेडणेकर यांनी व्यक्त केल्या.
ब्ल्यू फ्लॅगच्या अंतिम मानांकनासाठी आवश्यक विविध उपक्रमांना गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरुवात करण्यात आली असून, त्यातील पहिला उपक्रम म्हणून वाळूशिल्प प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, तर दीपक विचारे व नरेश पेडणेकर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण म्हणाले की, समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक किंवा कोणताही कचरा टाकण्यास यापुढे कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. व्यावसायिकांनी तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना स्वच्छतेबाबत सक्त सूचना द्याव्यात. ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर हे अत्यंत योग्य आणि सर्वोत्तम ठिकाण असून, या उपक्रमामुळे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, दर पंधरा दिवसांनी समुद्राच्या पाण्याची आणि हवेच्या गुणवत्तेची प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन विकसित करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असून, सर्वांनी एकत्र येऊन या पायलट प्रकल्पाला अंतिम मान्यतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाला तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, अॅड. संकेत साळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पर्यटनाची नवी पहाट
गुहागर गुहागर समुद्रकिनारी आंतरराष्ट्रीय पर्यटनाची नवी पहाट
गुहागर समुद्रकिनाऱ्यास ब्ल्यू फ्लॅग मानांकनाचा पायलट प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली असून, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या गुहागरला आता आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नेण्याची संधी निर्माण झाली आहे. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहकार्याने गुहागरला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवायचे आहे, अशा भावना ब्ल्यू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्पाचे सहाय्यक दीपक विचारे आणि नरेश पेडणेकर यांनी व्यक्त केल्या.
ब्ल्यू फ्लॅगच्या अंतिम मानांकनासाठी आवश्यक विविध उपक्रमांना गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरुवात करण्यात आली असून, त्यातील पहिला उपक्रम म्हणून वाळूशिल्प प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, तर दीपक विचारे व नरेश पेडणेकर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण म्हणाले की, समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक किंवा कोणताही कचरा टाकण्यास यापुढे कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. व्यावसायिकांनी तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना स्वच्छतेबाबत सक्त सूचना द्याव्यात. ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर हे अत्यंत योग्य आणि सर्वोत्तम ठिकाण असून, या उपक्रमामुळे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, दर पंधरा दिवसांनी समुद्राच्या पाण्याची आणि हवेच्या गुणवत्तेची प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन विकसित करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असून, सर्वांनी एकत्र येऊन या पायलट प्रकल्पाला अंतिम मान्यतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाला तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, अॅड. संकेत साळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चा पायलट प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली असून, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या गुहागरला आता आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नेण्याची संधी निर्माण झाली आहे. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहकार्याने गुहागरला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवायचे आहे, अशा भावना ब्ल्यू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्पाचे सहाय्यक दीपक विचारे आणि नरेश पेडणेकर यांनी व्यक्त केल्या.
ब्ल्यू फ्लॅगच्या अंतिम मानांकनासाठी आवश्यक विविध उपक्रमांना गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरुवात करण्यात आली असून, त्यातील पहिला उपक्रम म्हणून वाळूशिल्प प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, तर दीपक विचारे व नरेश पेडणेकर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण म्हणाले की, समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक किंवा कोणताही कचरा टाकण्यास यापुढे कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. व्यावसायिकांनी तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना स्वच्छतेबाबत सक्त सूचना द्याव्यात. ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर हे अत्यंत योग्य आणि सर्वोत्तम ठिकाण असून, या उपक्रमामुळे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, दर पंधरा दिवसांनी समुद्राच्या पाण्याची आणि हवेच्या गुणवत्तेची प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन विकसित करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असून, सर्वांनी एकत्र येऊन या पायलट प्रकल्पाला अंतिम मान्यतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाला तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, अॅड. संकेत साळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.