तोंडवळी तळाशील येथे तेरेकर रापण संघाच्या मांगराला आग

0
116
तोंडवळी तळाशील येथे तेरेकर रापण संघाच्या मांगराला आग
तोंडवळी तळाशील येथे तेरेकर रापण संघाच्या मांगराला आग

तोंडवळी तळाशील येथे तेरेकर रापण संघाच्या मांगराला आग

मालवण l

मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथील तेरेकर रापण संघाच्या मांगराला लागलेल्या आगीत दोन बोटी व एक पगार (छोटी होडी) व गारोगारीचे साहित्य जळून सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान तळाशील येथील तेरेकर आपण संघाच्या गांगराला अचानक आग लागली. आगीचे लोळ आणि धूर दिसून येताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहिले असता तर आपण संघाच्या मांगराला आग लागली असल्याचे दिसून आले. किनारपट्टी लगतच हा मांगर असल्याने वान्याच्या वेगामुळे आग भडकत गेली यात मांग असलेल्या दोन बोटी व एक छोटी होडी जळत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
 तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर, भाई आडकर, अशोक शेलटकर, चिनायक कोचरेकर स्वप्नील तारी, महेश मालंडकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मचिडेगार यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी मारण्यास सुरवात केली. मात्र वाऱ्याचा जोर जास्त असल्याने आगीच्या भडक्यात दोन नौका व छोटी होडी तसेच जाळी व अन्य मासेमारीचे साहित्य जळून खाक झाले. पात तेरेकर रापण संघाचे सुमारे १५ लाखाहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी महसूल व मत्स्यव्यवसाय विभागास दिली आहे. उद्या ते घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करणार असल्याची माहिती तळाशील ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here