‘स्वयंसिद्धा’ उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्रीशक्ती’ ॲपवर नोंदणी वाढवावी – राज्यपाल सचिव डॉ. नारनवरे

0
110
‘स्वयंसिद्धा’ उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्रीशक्ती’ ॲपवर नोंदणी वाढवावी – राज्यपाल सचिव डॉ. नारनवरे
‘स्वयंसिद्धा’ उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्रीशक्ती’ ॲपवर नोंदणी वाढवावी – राज्यपाल सचिव डॉ. नारनवरे

‘स्वयंसिद्धा’ उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्रीशक्ती’ ॲपवर नोंदणी वाढवावी – राज्यपाल सचिव डॉ. नारनवरे

मुंबई l  प्रतिनिधी
राज्य सार्वजनिक विद्यापीठांमध्ये महिला सशक्तिकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्रीशक्ती’ ॲपवर जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, महिलांनी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या कौशल्यांचा विकास करावा तसेच या उपक्रमांची माहिती वैयक्तिक आणि संस्थात्मक माध्यमातून प्रसारित करावी.‘लोकभवन’ येथे राज्यपालांचे सचिव डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत राज्यपालांचे उपसचिव राम मूर्ती, सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सचिव डॉ. नारनवरे म्हणाले की, राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम राबवला जात असून, आतापर्यंत अनेक महिला सदस्यांनी वेब पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्यांना ‘स्त्रीशक्ती’ ॲपवर नोंदणी करून उपक्रमाचा व्यापक प्रचार करावा. प्रत्येक विद्यापीठातील महिला अधिकारी नियमित बैठकीत उपक्रमांचे नियोजन करतात आणि त्याची माहिती पोर्टल तसेच वैयक्तिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करणे आवश्यक आहे.त्यांनी महिला विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ‘स्वीप (SVEEP)’ उपक्रमाचा प्रचार करावा आणि मतदानाचा हक्क पाळण्याबाबत माहिती द्यावी, असेही सांगितले.
या उपक्रमासाठी ‘वुमन एम्पॉवरमेंट’ हा हॅशटॅग वापरून प्रचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.डॉ. नारनवरे यांनी महिला बालविकास विभागाला ‘आदिशक्ती’ उपक्रमात स्वयंसिद्धा सहभाग नोंदवण्याचे तसेच महादेव प्रोजेक्टसाठी महिला फुटबॉल टीम तयार करण्यास आवाहन केले. शिवाय, उपक्रमातील यशोगाथा पोर्टलवर प्रसिद्ध करून अधिकाधिक महिलांना माहिती पोहोचवावी, असे त्यांनी नमूद केले. ज्या विद्यापीठांमध्ये अधिक क्रियाशीलता असेल, अशा विद्यार्थ्यांचे रँकिंग देखील जाहीर केले जाईल.हा उपक्रम महिला सशक्तिकरणासाठी महत्वाचा टप्पा असून, स्त्रीशक्ती ॲपवर नोंदणी आणि सक्रिय सहभाग यामुळे महिलांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here