एका मताने सुनेला सरपंचपदाची संधी

0
101
एका मताने सुनेला सरपंचपदाची संधी
एका मताने सुनेला सरपंचपदाची संधी

एका मताने सुनेला सरपंचपदाची संधी

लोकशाहीत मतदानाचे महत्त्व किती मोठे आहे, हे तेलंगणातील एका ग्रामपंचायत निवडणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. “एका मताने काय फरक पडतो?” असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ही घटना डोळे उघडणारी ठरली आहे. कारण अवघ्या एका मतामुळे एका महिलेला सरपंचपद मिळाले, आणि ते मत देण्यासाठी तिचे सासरे थेट अमेरिकेहून गावात दाखल झाले होते.

तेलंगणात रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. या टप्प्यात ८५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून, विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. निर्मल जिल्ह्यातील लोकेश्वरम मंडलमधील बागापूर ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली.

या निवडणुकीत मुथ्याला श्रीवेदा यांनी सरपंचपदावर बाजी मारली. विशेष म्हणजे त्या फक्त एका मताच्या फरकाने विजयी झाल्या. या विजयामागे सर्वाधिक चर्चेत आले ते त्यांचे सासरे, जे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खास अमेरिकेतून गावी परतले होते. त्यांचे हे एकमेव मत श्रीवेदांसाठी अक्षरशः वरदान ठरले.

ही घटना लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करणारी असून, मतदानाबाबत उदासीन असलेल्या नागरिकांसाठी प्रेरणादायी संदेश देणारी ठरत आहे. एक मतही इतिहास घडवू शकते, हेच या निवडणुकीने सिद्ध करून दाखवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here