दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी चार पर्यटकांना बुडण्यापासून वाचवले

0
334
दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी चार पर्यटकांना बुडण्यापासून वाचवले
दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी चार पर्यटकांना बुडण्यापासून वाचवले

दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी चार पर्यटकांना बुडण्यापासून वाचवले

पणजी:
दृष्टी मरीनच्या प्रशिक्षित जीवरक्षकांनी या आठवड्यात समुद्र‌किनाऱ्यांवर तामिळनाडूतील आई-मुलासह चार पर्यटकांना बुडण्यापासून वाचवले, तसेच बेपत्ता झालेल्या दोन लहान मुलांना शोधून काढून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
५ मित्रांसह तेलंगणातील २२ वर्षीय युवक समुद्रात उतरला होता. नशेत असल्याने तो बुडू लागल्याचे पाहताच त्याला जीवरक्षक विष्णू कुबल आणि मनोज परब यांनी तातडीने सर्फबोर्ड आणि रेस्क्यू ट्यूबचा वापर करून मदत केली.
त्यानंतर जेट स्कीच्या साहाय्याने त्याला किनाऱ्यावर आणले. दुसऱ्या घटनेत तामिळनाडूतील आई आणि तिचा १० वर्षांचा मुलगा मांद्रे येथे समुद्रात पोहत असता त्यांना किनाऱ्यावर परतणे अशक्य झाले.
जीवरक्षक दत्तगुरू यांनी रेस्क्यू बोर्ड आणि जेट स्कीवरील सुधीर परब यांच्या मदतीने दोघांनाही सुखरूप वाचवले, पुण्याहून आलेले ५ वर्षांचे एक मूल बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी केली. नंतर जीवरक्षकांनी काही वेळातच त्या मुलाला शोधून काढले आणि मुलाला पालकांच्या स्वाथीन केले. पाळोळे किनाऱ्यावर ७८ वर्षांची विदेशी पर्यटक महिला पाण्याच्या प्रवाहात (रिप करंट) ओढली जात होती.
जीवरक्षक दिनेश वेळीप यांनी धाव घेत त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. याच किनाऱ्यावर बंगळुरूची ३ वर्षाची मुलगी देखील बेपत्ता झाली होती. जीवरक्षकांनी दहा मिनिटांत तिला शोधून काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here