कणकवली पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन
कणकवली
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष उदय सावंत, उपाध्यक्ष नारायण गावकर, सचिव विश्वास सावंत, खजिनदार संजय गोरुले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, समाजसेवा अधीक्षक नितीन तुरनर, नर्सिंग ऑफिसर सुमंगल बुगडे, रक्तपेढी तंत्रज्ञ प्रांजली पावस्कर, रक्तपेढी सहाय्यक ऋतुजा हरमलकर, परिचर गणपत गाडगे, परिचर सचिन बिले, वाहन चालक नितीन गावकर तसेच मुख्यमंत्री सहायता निधीचे समाजसेवा अधीक्षक सुनील कुंडगिर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत पोलीस पाटील यांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिला पोलीस पाटील तसेच नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी पोलीस पाटील दिनानिमित्त शुभेच्छा देत गावपातळीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या पोलीस पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. डॉ. स्वप्नील चव्हाण यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पोलीस पाटील यांच्या सेवेबद्दल अभिनंदन केले.


