डोक्यात भाला घुसल्याने विद्यार्थी गंभीर जखमी

0
104
डोक्यात भाला घुसल्याने विद्यार्थी गंभीर जखमी
डोक्यात भाला घुसल्याने विद्यार्थी गंभीर जखमी

डोक्यात भाला घुसल्याने विद्यार्थी गंभीर जखमी

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग )  : –
कोनाळकट्टा येथील एका विद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू असताना भाला फेक स्पर्धेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. आदिराज रामदास नाईक (वय १२ ) असे विद्यार्थ्याचे नाव असून या विद्यार्थ्याला भाला डोक्यात लागून गंभीर दुखापत झाली आहे.
कोनाळकट्टा येथील एका प्रशालेत शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या स्पर्धेत भाला फेक खेळ सुरू झाला. यावेळी अभिराज नाईक यांच्या डोक्यात भाला घुसला. त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे हलवण्यात आले. अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनीही बांबोळी येथे जाऊन जाबजबाब घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here