वेंगुर्ला प्रतिनिधी – – केळूस गावातील चर्मकार वस्तीत जाणाऱ्या रस्त्यावर डबर .रेती दगड टाकून गेले तीन महीने रस्ता अडवून ठेवला आहे सदर बाब ठेकेदाराला वस्तीतील ग्रामस्थांनी कळवूनही त्यावर कोणतीच प्रतीक्रया न देता आडमुठेपणाचे धोरण त्याने अवलंबले असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्याक्त केली आहे. सदर रस्त्यावर स्मशान भुमीचे नुतनीकरणाचे काम सुरू असून गेले तीन महीने अर्धवट स्थितीत आहे त्यामुळे बांधकामाचे सर्व साहीत्य रत्यावर पडून आहे त्यामुळे वस्तीत येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. संबंधित खात्याने ठेकेदाराला सुचना करून चर्मकार वस्तीत जाणाऱ्या रस्ता मोकळा करावा अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.