शिल्पकार राम सुतार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

0
275
शिल्पकार राम सुतार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
शिल्पकार राम सुतार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

शिल्पकार राम सुतार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

जगप्रसिद्ध शिल्पकार व ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारप्राप्त राम सुतार यांच्या पार्थिवावर नोएडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कला क्षेत्रातील या थोर व्यक्तिमत्त्वाला शासन व देशभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून सुतार यांना आदरांजली वाहिली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून दुःख व्यक्त करत कुटुंबीयांना धीर दिला व शोकसंवेदना व्यक्त केल्या.

गेल्याच महिन्यात राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता. त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रात अपूरणीय अशी हानी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here