ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रणजित मोहन यादव

0
125
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रणजित मोहन यादव
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रणजित मोहन यादव

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रणजित मोहन यादव

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रणजित मोहन यादव (भा.प्र.से., २०२२ बॅच) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले रोहन घुगे यांची बदली जिल्हाधिकारी, जळगाव येथे झाली असून, त्यांच्या बदलीनंतर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे ठाणे जिल्हा परिषदेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता, जो त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळला.

पदभार स्वीकारताना रणजित यादव यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक व विकासाभिमुख करण्याचा संकल्प व्यक्त केला. शासनाच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाधारित व परिणामकारक प्रशासन राबविण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात ‘आदि कर्मयोगी’ अभियान, आदिवासी विकास योजना तसेच ई-गव्हर्नन्स उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here