ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी आमदार निरंजन डावखरे यांची नियुक्ती
ठाणे l
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ठाणे महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने अधिकृत करण्यात आली आहे.
संघटनात्मक अनुभव आणि निवडणूक व्यवस्थापनातील नेतृत्व कौशल्य लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली असून, ठाणे शहरातील निवडणूक तयारीला यामुळे बळ मिळेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.


