एमएसआरटीसी प्रवाशांसाठी ऑनलाइन पेमेंट व रिफंड प्रक्रिया जाहीर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) बस प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाइन पेमेंट व रिफंड प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट बुक करून रक्कम भरली, मात्र तांत्रिक कारणामुळे तिकीट प्राप्त न झाल्यास संबंधित खात्यात ३ ते ७ दिवसांत रक्कम आपोआप परत (रिफंड) केली जाणार आहे.
प्रवाशी ईटीआयएम–ओएसआरएस प्रक्रियेशी संबंधित रिफंडसाठी २४×७ कार्यरत मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. मात्र, सर्व रिफंड ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच केली जाणार असल्याचे एमएसआरटीसीने स्पष्ट केले आहे.


