Kokan: कोकण परिमंडलात महावितरणकडून ६७४ ग्राहकांना प्रकाशाची ‘दिवाळी भेट’

0
46
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासोबत मोफत वीज योजनेची भरपाई
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासोबत मोफत वीज योजनेची भरपाई

कोकण परिमंडल: महावितरणच्या कोकण परिमंडलाने १५ दिवसांपूर्वी ‘प्रत्येक घरी दिवा – प्रत्येक घरी दिवाळी’  हा संकल्प केला. महावितरणने रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्ह्यातील ६७४ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देऊन दिवाळीला प्रकाशाची भेट दिली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-महावितरणच्या-अधिकारी-व/

दिवाळी म्हणजे दीपांचा, प्रकाशाचा उत्सव ! दारी नक्षीदार रांगोळी, आकर्षक आकाशकंदील, घराच्या इमारतीवर नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, चटपटीत व मिष्टांनाची मेजवानी.अनेकजण दिवाळीला आपल्या स्वप्नांतील नवीन घरात प्रवेश करतात.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन वीज जोडणीची मागणी करणाऱ्या अर्जदारांना तत्पर वीज जोडणी देण्याचा  संकल्प महावितरणने केला. प्रत्येक घर प्रकाशमान व्हावे, या भूमिकेतून मुख्य अभियंता मा.श्री. परेश भागवत यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. अधीक्षक अभियंता मा. श्री. स्वप्निल  काटकर (रत्नागिरी मंडल), अधीक्षक अभियंता मा.श्री.विनोद पाटील (सिंधुदुर्ग मंडल) यांच्या  मार्गदर्शनाखाली उर्वरित जबाबदारी सर्व विभागीय कार्यकारी अभियंता व क्षेत्रीय अधिकारी – कर्मचाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. चोख नियोजन आखले. महावितरण मुख्यालयाकडून आवश्यक वीज मीटर तातडीने उपलब्ध करुन देण्यात आले.

ग्राहकांची प्रकाशाची दिवाळी साजरी होण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या महावितरणच्या अभियंते व जनमित्रांनी कामास सुरूवात केली. सलग १५ दिवस सातत्यपूर्ण परिश्रमातून रत्नागिरी  जिल्ह्यात ४६५  तर  सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०९ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देऊन प्रकाशाचे नाते जपले. अस्तित्वातील विद्युत यंत्रणेतून  रत्नागिरी जिल्ह्यात ३४६ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४६ ग्राहकांना आणि नवीन विद्युत यंत्रणा उभारणी करुन रत्नागिरीत जिल्ह्यात ११९ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६३ ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. महावितरणच्या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

————————–

प्रति,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here