दापोली प्रभागाच्या हिवाळी क्रीडा  उत्साहात

0
140
दापोली प्रभागाच्या हिवाळी क्रीडा  उत्साहात
दापोली प्रभागाच्या हिवाळी क्रीडा  उत्साहात

दापोली प्रभागाच्या हिवाळी क्रीडा  उत्साहात

दापोली l
रत्नागिरी जिल्हा परिषद तथा पंचायत समिती दापोली आयोजित दापोली तालुक्यातील दापोली शिक्षण प्रभागाच्या हिवाळी शालेय क्रीडास्पर्धा नुकत्याच दापोली येथील मराठा मंदिर प्रशालेच्या भव्य मैदानात मोठ्या उत्साहात पार पडल्या.
दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दापोलीचे गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभात जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर केली.  गिम्हवणे शाळेतील विद्यार्थ्यांनी संचलन सादर केले तर मौजे दापोली शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडाज्योतीचे अनावरण केले. उद्घाटन तसेच स्वागत समारंभासाठीच्या व्यासपीठावर क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष सुनील कारखेले, मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुनील दळवी, जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे, दापोली प्रभाग अंतर्गत ताडील सुरा तथा आसूद केंद्रप्रमुख गुलाबराव गावित, हर्णे उर्दू केंद्रप्रमुख जलील ऐनरकर, मराठा मंदिर संस्थेचे मुख्याध्यापक अरविंद मांडवकर, प्रा. कुणाल मंडलीक, आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवात पहिल्या दिवशी मुलगे सांघिक, मुली वैयक्तिक तसेच मुलींच्या लंगडीच्या स्पर्धा तर दुसर्‍या दिवशी मुली सांघिक व मुलगे वैयक्तिक अशा स्पर्धा पार पडल्या. सांघिक क्रीडा प्रकारात कबड्डी, खो-खो, लंगडी तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक यांचा समावेश होता. क्रीडा महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका प्रिती शिर्के, दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी बळीराम राठोड, केंद्रप्रमुख सुनील कारखेले, गुलाबराव गावित, जलील ऐनरकर, सर्व केंद्र मुख्याध्यापक तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या ठरलेल्या संघांना, खेळाडूंना ट्राॅफी, मेडल व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. क्रीडा स्पर्धेचे यजमानपद गिम्हवणे केंद्राकडे असल्याने केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली गिम्हवणे केंद्रातील सर्व शिक्षकांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फार मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here