चंद्रनगर येथे गिम्हवणे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न
दापोली l
तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच चंद्रनगर येथील स्वयंभु श्री घाणेकरीन मंदिराजवळील मैदानावर पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये गिम्हवणे केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा सहभागी झाल्या होत्या.
स्वयंभु श्री घाणेकरीन देवी मंदिराजवळील मैदानावर आयोजित केलेल्या या गिम्हवणे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे दिमाखदार सोहळ्याने तसेच शिस्तबद्ध संचलनाने उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभासाठीच्या व्यासपीठावर स्वयंभु श्री घाणेकरीन देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, चंद्रनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी बळीराम राठोड, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष अनिल मुलुख, चंद्रनगर ग्रामविकास अधिकारी संदीप सकपाळ, पोलीसपाटील गौरी पागडे, चंद्रनगर तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत मुलुख, अर्जुन पागडे, विजय मुलुख, संदीप गार्डी, राकेश शिगवण, सदानंद मुलुख, स्वरुप मुलुख, शैलेश मुलुख, प्रवीण मुलुख, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक आदी मान्यवर उपस्थित होते. मोहन मुळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत संचलनाचे प्रात्यक्षिक सादर केले. याशिवाय याच विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचे शिस्तबद्ध व लयबद्ध प्रकार सादर करून सर्वांची वाहवा मिळवली.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, लंगडी यांसारख्या सांघिक तसेच धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या. विजेते संघ व खेळाडूंना ट्राॅफी, मेडल, प्रशस्तिपत्र, शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गिम्हवणे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचे नियोजन केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. गिम्हवणे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा यशस्वी होण्यासाठी चंद्रनगर ग्रामस्थ मंडळ, चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समिती, चंद्रनगर ग्रामपंचायत, ग्रामस्थ, महिला पालक, शिक्षक अशा सर्वांनी विशेष मेहनत घेतली.