वेंगुर्ला प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेला कलादान राज्य सांस्कृतिक पुरस्कार हा केवळ माझा नसून कोकणच्या दशावतार कलेला मिळालेला पुरस्कार असल्याचे तेंडोली येथील ज्येष्ठ दशावतार कलाकार यशवंत तेंडोलकर यांनी सत्काराप्रसंगी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-भारताचा-गौरवशाली-परंपरे/
महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा २०२३ चा कलादान राज्य सांस्कृतिक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील ज्येष्ठ दशावतार कलाकार यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांना नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते मुंबईमध्ये या पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
या जाहीर झालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने वेंगुर्ला येथील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाच्यावतीने यशवंत तेंडोलकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन नाईक मोचेमाडकर मंडळाचे संचालक तुषार नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल, नाईक दशावतार मंडळाचे कलाकार निलेश नाईक, घनःश्याम पालव उपस्थित होते.
फोटोओळी- नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाच्यावतीने यशवंत तेंडोलकर यांचा तुषार नाईक यांनी सत्कार केला.