बँक हॉलिडे आणि रविवार सुट्टीच्या दिवशीही नोकरदारांचे पगार बँकेत जमा करता येणार आहे. त्यामुळे बँकेला सुट्टी आहे म्हणून पगार रखडणार नाही.रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२१ पासून केली जाणार आहे.
आता नव्या नियमानुसार ,रविवार आणि बँक हॉलिडे सारख्या सुट्टीच्या दिवशी ऑटो डेबिट होणार आहे.याआधी सुट्टीच्या दिवशी ऑटो डेबिट होत नव्हते.त्यामुळे नोकरदारांचा पगार त्यादिवशी बँकेत जमा होत नव्हता. त्यामुळे अन्य कामेही होत नव्हती.आता या निर्णयामुळे डिव्हिडंड, व्याजदर ,वेतन,पेन्शन, वीजबिले,गॅसबील ,टेलिफोन बिल,पाणी बिल, कर्जासाठीचे हफ्ते,म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, विम्याचे हफ्ते आदी सर्व बाबींची पूर्तता सुट्टीच्या दिवशी करता येणार आहे.त्यामुळे खातेदारांना यापुढे ज्यादिवशी ऑटो डेबिट होणार आहे. त्यादिवशी तो दिवस रविवार किंवा अन्य सुट्ट्यांचा असला तरी खात्यात बॅलन्स राखावा लागणार आहे.नाहीतर त्यांना दंड भरावा लागेल.